23 वर्षांचे पंडित दिनेश शर्मा हे राहुल गांधींचे जबरदस्त फ़ॅन आहेत. ते हरयाणाच्या जिंद येथील रहिवाशी आहेत. त्यांची इच्छा आहे कि कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान व्हावेत. त्यांची राहुल गांधींवरील भक्ती एवढी निस्सीम आहे कि त्यांनी प्रण केला आहे कि जोपर्यंत राहुल गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत ते चप्पल घालणार नाहीत आणि लग्न सुद्धा करणार नाहीत. ते गेली 7 वर्षे राहुल गांधी ह्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी दौरा करीत आहेत. कुठलाही ऋतू असला म्हणजे उन असो, पाऊस असो वा थंडी असो ते पायात चप्पल घालत नाहीत. ते म्हणतात राहुलजींच्या लग्नानंतरच मी लग्न करेन. ते त्यांच्या नावाआधी पंडित सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या पासून प्रेरित झाल्यामुळे लावतात. आता त्यांच्या पायात कधी चप्पल येते हे बघणे रोचक ठरेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews